📰 ताज्या घडामोडी

ह भ प तुकाराम महाराज मुंढे शास्त्री यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली वाघाळा येथील अंखड हरीनाम सप्ताहची सांगता

Shamsundar chittoda
28 नोव्हेंबर 2021⏱️ ३ मिनिटे वाचन
WhatsApp

तळणि(रवी पाटील)

काकूलती येता हरी

क्षणभरी निवडीता ॥१॥

तुमची मज लागली सवे

ठायीचे नवे नव्हो गडी ॥ धृ ॥

या जगदगुरू तुकाराम महाराजाच्या काल्याच्या प्रकरणातील मांडणी करणाऱ्या अंभगावर सुंदर निरूपण केले भगवान पर त्माची उपासना करत असत असताना दोन प्रकार सागितले आहे एक परमात्मा सगून मानला आहे तर एक निर्गुन मानला आहे शास्त्र त्याला निर्गुन म्हणतय आणि संत त्याला संगून म्हणतात संत ज्ञानोबारायाना सुध्दा हा प्रश्न पडला होता तुज सगून म्हणू की निर्गुन रे पण संताच्या नंतर लक्षात आले सगून निर्गूनी गोविंदू रे ज्याला शास्र अव्यक्त म्हणतात त्यालाच संत व्यक्त म्हणतात व्यक्त आणि अव्यक्त तुचि एक निभ्रांत हे निळोबारायाचे प्रमाण सिद्ध आहे भक्ती साधना ही व्यक्त होणारी साधना साधना असावी योग साधना ही अव्यक्त साधनात होते तर भक्ती मार्गाने केलेली साधना ही व्यक्त साधनांना ने प्राप्त होईल संतांनी सागीतल्या प्रमाणे निर्गुण परमात्मा हा प्राप्तीचा विषय नसतो निर्गुण हा अनुभव याचा असतो आणि सगूण प्राप्त करून घ्यायचा असतो मनष्य जर निर्गुणाच्या अनूभुतीचा विचार करू लागला तर मनुष्य जीवनात साधना खडतर आहे *नाना साधनाच्या केल्या खटाटोप अस निळोबारायांनी सांगीतलेच आहे*

मनुष्याच्या आयुष्यातील सगून परमात्म प्राप्तीचा विषय आहे ठरवले लोक तुमच्या सोबत खायला प्यायला उठबस करातील सगून जर मनूष्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर श्रीकृष्णाने गीतेत सांगीतल्या प्रमाणे तुम्हाला जर मी हवा असेल तर तुम्हाला माझ्यासारखे व्हावे लागेल तुम्ही ज्या भावनेने माझ्याकडे याल त्याच भावनेने मी तुमच्या कडे येईल तुमची भक्तीचा भाव ज्या प्रमाणे असेल जप तप कर्म असेल भले मग योग साधनेचा भाव असेल त्या प्रमाणे मी तुमच्या सोबत असेल

*भक्तीच्या सिद्धांतातील ज्ञानोबारांयाची ओवी सांगीतली की विषय संपला ज्ञानोबारांयांची ओवी म्हणजे खणखणीत वाजणारा शिक्का आहे अनेक संतांनी माऊलीचे अभंग ओव्या किर्तनातून समाजाला सांगीतल्या आहे*

देवाकडे आपण ज्या भावाने जातो त्याच भावाने तो आपल्याकडे येत असतो तो फक्त भक्ताचा भाव बघत असतो *भाव तैसा हरी एक* एकच हरी पण जसा ज्याचा भाव तसा त्याचा देव देव काही बाजारात मिळणारी वस्तू नाही त्यासाठी भक्तीचा सघर्ष उभा करावा लागतो कॄष्णाच्या संवगड्यावर जसी भक्ती विश्वास प्रेम होते ती भक्ती भंगवंताला प्रिय होती ना देव सवंगड्याशिवाय राहु शकत नव्हता ना संवगडी देवाशिवाय देवाला आपले करायचे असेल त्यासाठी भक्तीचा आलेखाची उंची मोठी असावी लागते ज्यानी ज्यानी परमार्थाची पराकाष्ठा केली ते ते व्यवहारीक जीवनामध्ये शहाणे राहीले आहे देव जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्यासाठी वेड सुध्दा व्हाव लागेल जशा गोपीका देवासाठी वेड्या झाल्या होत्या त्या वेडेपनात प्रेम आपुलकी विश्वास स्नेह या गोष्टीचा सुंगध दरवळत असे देव आणि गोपीका संवगडी यांच नाते मैत्रीचे नात होते भक्ताना शहाणे म्हणावे की वेडे म्हणावे याच सुदंर वर्णन महाराजानी उपस्थीता समोर केले

कृष्ण चरिञ हे त्यागाचे चरित्र आहे ज्यामधून अनेक पैलू आपल्याला दीसतील पांडवाच्या आयुष्यातील देवाचा सहभाग हा धर्माच्या बाजूच्या सहभाग होता तो खरा धर्म आपण जोपासला पाहीजे कृष्णाला जरी आपण आचरणात नाही आनू शकलो पण त्याच्यासाठी गोपीनी संवगडयानी केलेली भक्ती आपण नक्कीच आचरणात आणू शकतो ती भक्ती जर आपण स्वीकारली तर देव देश अनधर्माकडे बघण्याची हिमत होणार नाही असे महाराजांनी शेवटी सांगीतले

सात दीवस चालणाऱ्या या सप्ताहाची सांगते साठी पंचक्रोशातून अनेकांची उपस्थीती होती संत नेमिनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्थेमधील विद्यार्थ्यानी सात दिवस सांथ संगत केली महाप्रसाद वाटप करून सप्ताहाची सांगता झाली

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात