📰 ताज्या घडामोडी

भारतीय जनता पार्टी हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन*

Shamsundar chittoda
26 डिसेंबर 2020⏱️ ३ मिनिटे वाचन
WhatsApp

भारतीय जनता पार्टी हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष असून यामध्ये पक्ष म्हणजे आपली खाजगी मालमत्ता असल्याची भावना कोणताही नेता बाळगू शकत नाही अगदी सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर हा पक्ष उभा असून नेहमीच सर्वसामान्य माणसाच्या सर्वांगीण विकासाचा प्रयत्न करणारा पक्ष असल्याचे प्रतिपादन भाजपा नेते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले

मंठा येथे आयोजित पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या अभ्यासवर्ग दरम्यान लोणीकर बोलत होते यावेळी भाजपा मंठा तालुका अध्यक्ष सतीश निर्वळ जिल्हा उपाध्यक्ष गणेशराव खवणे सभापती संदीप गोरे उपसभापती नागेश घारे उपसभापती राजेश मोरे पंजाबराव बोराडे कैलास बोराडे जिजाबाई जाधव माऊली शेजुळ सुभाष राठोड नाथराव काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती

जुन्या जनसंघमधून भारतीय जनता पार्टीचा जन्म झाल्यानंतर डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी पंडित दीनदयाल उपाध्याय नानाजी देशमुख यांच्यापासून स्वर्गीय पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्यापर्यंत अनेकांनी पक्ष उभा करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली असून तळागाळापर्यंत पक्ष पोहचविण्याचे काम पक्षाच्या प्रत्येक लहानथोर कार्यकर्त्यांनी केला आहे हा पक्ष केवळ आणि केवळ कार्यकर्त्यांच्या बळावर उभा असून भारतीय जनता पार्टी कुणाचीही खाजगी मालमत्ता नाही इतर पक्षांची अवस्था बघता ते पक्ष फॅमिली पार्टी असल्याचे चित्र तुम्हाला दिसून येईल परंतु भाजपा मध्ये मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय नव्हतो ही भावना सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे म्हणूनच 2 खासदारांनी पासून 303 खासदारांपर्यंत ची मजल भारतीय जनता पार्टीने मागील काही वर्षांमध्ये मारली आहे असे यावेळी लोणीकर यांनी स्पष्ट केले

देशामध्ये हे अस्तित्वात असणाऱ्या राष्ट्रीय पक्षांमध्ये फक्त भारतीय जनता पार्टी कडे सर्वसामान्य व्यक्तीच्या विकासाचा अजेंडा असून सर्वसामान्य व्यक्तीच्या भल्यासाठी अनेक कठोर निर्णय घेण्याची धमक देखील यात पक्षामध्ये आहे नोटबंदी जीएसटी नागरिकत्व सुधारणा कायदा तिहेरी तलाक काश्मीरमधील 370 कलम हटवणे शेतकरी सुधारणा विधेयक राम मंदिर निर्माण यासारख्या एक ना अनेक बाबी ज्या इतर सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत केवळ राजकारणाचा मुद्दा म्हणून खितपत ठेवल्या त्या सर्वांना भारतीय जनता पार्टीने पूर्णत्वास नेले आहे त्यामुळे मागील साठ वर्षाचा अनुशेष मागील काळात देशाचे महामहिम पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या नेतृत्वात भरून काढण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करत आहे असेही लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले

सर्वसामान्य व्यक्तीला नजरेसमोर ठेवून पंतप्रधान किसान सन्मान योजना उज्वला गॅस योजना यासारख्या अनेक सर्वसामान्य व्यक्तीच्या ीवनाशी निगडित असणार्‍या योजना आणून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करण्यात आला आहे मागील पंचवार्षिक मध्ये शेतकऱ्यांना 50 हजार कोटी रुपयांपर्यंतची मदत देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून करण्यात आली आहे प्रत्येक गाव वाडी वस्ती तांडा डांबरी करण्याच्या रस्त्याने जोडण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आला आहे प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीला थेट लाभ मिळावा यासाठी प्रधानमंत्री आवास योजना शबरी आवास योजना रमाई आवास योजना संजय गांधी निराधार योजना यासारख्या अनेक योजनांच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न व त्या व्यक्तीला न्याय देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी कडून करण्यात आला असल्याचे देखील लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले केवळ भारतीय जनता पार्टी सर्वसामान्य व्यक्तीला न्याय मिळवून देऊ शकते असा ठाम विश्वास देखील यावेळी लोणीकर यांनी व्यक्त केला

यावेळी संचालक प्रसादराव बोराडे माऊली वायाळ निवास देशमुख गणेश चव्हाळ संतोष बोराडे सोपानराव खरात अनंता वैद्य रावसाहेब वैद्य महादेव बाहेकर दीपक दवणे शंतनू काकडे गोपीचंद पवार कल्याण उबाळे विकास चव्हाण दत्ता खराबे बाळासाहेब इंगळे सोपान वायाळ रमेश वायाळ सूर्यकांत जाधव नारायण कणसे अशोक सोनटक्के विनायक सोनटक्के सुरेश राठोड श्रीराम राठोड रामकिसन अवचार संजय गायकवाड गणेश राव शहाणे राजू नरवडे नारायण दवणे पवन केंदळे दिलीप जोशी शिवराज तळेकर जयंत किनगावकर गजानन कराळे दिलीप पवार दिगंबर महादेव काळे डॉ. शरद पालवे रामेश्वर काकडे सचिन घाडगे गजानन खेडेकर राम राठोड विनोद राठोड सुरेश राठोड यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात