📰 ताज्या घडामोडी

युवा मोर्चाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट*,======================*विक्रांत पाटील ,राहुल लोणीकर,शिवानीताई दाणी, आदींचा शिष्टमंडळात समावेश*======================*युवकांचे प्रश्न आणि मराठवाड्यातील परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या झालेल्या प्रचंड नुकसानी बाबत केली चर्चा*=======================

Shamsundar chittoda
16 ऑक्टोबर 2020⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

परतूर (प्रतिनिधी) आज दिनांक 16 रोजी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा च्या शिष्टमंडळाने महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन राज्यातील युवकांचे प्रश्न आणि मराठवाड्यातील परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या झालेल्या प्रचंड नुकसाना संदर्भात चर्चा केली.

या शिष्टमंडळात मध्ये युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील भाजयुमोचे प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर, शिवानी ताई दाणी, सुशील मेंगडे, युवती प्रमुख मीनाताई केदार यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यां चा समावेश होता.

यावेळी राज्यपाल महोदयांना राज्यातील युवकांचे कोरोणा संकटाच्या काळात प्रचंड असे नुकसान झाले अनेक युवा उद्योजक आर्थिक संकटात सापडले, शैक्षणिक क्षेत्रातही विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला या विषयासह मराठवाड्यामध्ये परतीच्या पावसाने अनेक नद्यांना महापुरे आली त्यामध्ये शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून सोयाबीन, मका कापूस, इत्यादी नगदी पिकासह पपई, केळी ,ऊस द्राक्ष बगा, मोसंबी, यासह बागायती शेती ही उध्वस्त झाली या संदर्भामध्ये महामहिम राज्यपाल महोदयांनी लक्ष घालण्याची विनंती करण्यात आली.

राज्याचे सरकार युवक व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कुठली भूमिका घेत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला असून मराठवाड्यामध्ये प्रचंड प्रमाणात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे अशातच सरकार पंचनामे करण्याचा घाट घालत असून असून, विनाअट शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज असल्याचे शिष्टमंडळाने महामहिम राज्यपाल यांच्या लक्षात आणून दिले

या वेळी राज्यपालाना निवेदन देऊन मराठवाड्यातीलशेतकऱ्यांच्या भावना कळवण्यात आल्या.या मध्ये मराठवाडयात गेल्या दोन महिन्या पासून पाऊस चालू आहे काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी ढग फुटी मूळे मराठवाडा तील शेतीचे पूर्ण पणे नुकसान झाले असून जालना जिह्यातील 7 लाख हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले त्यामध्ये कापूस,सोयाबीन, मका, बाजारी, मूग ,उडीद व इतर संपूर्ण खरीप पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले आहेत तर 6 हजार हेकटर जमिनीवरील केळी, मोसंबी, ऊस, संत्री, डाळींब, पेरू, सीताफळ आदी पिके हातची गेली आहेत

आदी मागण्याचे निवेदन देण्यात आले

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात