📰 ताज्या बातम्या

भोकरदन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा भव्य लोकार्पण सोहळा

च
श्याम सुंदर चित्तोडा
10 नोव्हेंबर 2026•⏱️ १ मिनिटे वाचन
WhatsApp
भोकरदन प्रतिनिधी:
अमित लोहाडे :

शेतकरी बांधवांच्या घामाला योग्य दाम मिळवून देणारे आणि परिसरातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य केंद्रबिंदू असणाऱ्या बाजार समितीच्या या अत्याधुनिक व सुसज्ज इमारतीमुळे शेतकरी, अडते, व्यापारी तसेच हमाल बांधवांसाठी कामकाजात अधिक सुलभता, गती आणि पारदर्शकता येणार आहे. या मंगलप्रसंगी आ.संतोष भाऊ दानवे यांनी उपस्थित राहून शेतकरी बांधव, व्यापारी वर्ग, बाजार समितीचे सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ आणि स्थानिक नागरिकांशी मनमोकळा संवाद साधला व नूतन प्रशासकीय इमारतीच्या निमित्ताने सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते शिवाजी बापू थोटे, गणेश बापू फुके, सौ आशाताई पांडे, बद्री भाऊ पठाडे, एल के दळवी, तुकाराम पाटील जाधव, भाऊसाहेब जाधव, कमलाकर अण्णा साबळे, कडूबा दादा खरात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कौतिकराव पाटील जगताप, उपसभापती मधुकर मुगटराव यांच्यासह सर्व सन्माननीय संचालक मंडळ, नगरसेवक, व्यापारी महासंघ, पत्रकार बंधू व मोठ्या संख्येने तालुक्यातील बंधू-भगिनी उपस्थित होत्या.
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰
📡आपण ऑफलाइन आहात