📰 ताज्या बातम्या

भगवानगडावर दसरा मेळाव्याचा जयघोष; वंजारी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे

च
श्याम सुंदर चित्तोडा
12 ऑक्टोबर 2026•⏱️ १ मिनिटे वाचन
WhatsApp
जालना प्रतिनिधी : श्री क्षेत्र भगवानगड, सावरगाव घाट येथे जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास जालना जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील सकल वंजारी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जय बजरंग फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे जिल्हाध्यक्ष उमेश कुटे यांनी केले आहे.

संत भगवान बाबांच्या पवित्र भूमीत आयोजित करण्यात आलेला हा मेळावा समाजाच्या श्रद्धा, एकजूट आणि समृद्ध परंपरेचा उत्सव आहे. समाजातील बंधुभाव अधिक दृढ करण्यासाठी युवकांसह सर्व समाजबांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहनही कुटे यांनी केले.
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰
📡आपण ऑफलाइन आहात