तालुका/ शालेय क्रिकेट क्रीडा स्पर्धा नुकत्याच उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत योगानंद शाळेच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
मुलांच्या वयोगटातील स्पर्धेत योगानंद शाळेच्या संघाने घवघवी यश संपादन केले. चुरशीच्या लढतीत खेळाडूंनी उत्तम सांघिक खेळ, दमदार बचाव आणि अचूक आक्रमणाचे प्रदर्शन केले. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी केलेली मेहनत या यशातून दिसून आली.
तर मुलींच्या बी वयोगट १९ वर्षाखालील गटात योगानंद शाळेच्या मुलींनी घवघवीत यश मिळवले. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच आघाडी घेत त्यांनी प्रतिस्पर्धी संघांवर वर्चस्व गाजवले. अंतिम सामन्यात त्यांनी आत्मविश्वासपूर्ण खेळ करत विजेतेपद पटकावले.
या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, शिक्षकवृंद आणि पालकांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. यावेळी बोलताना मुख्याध्यापक म्हणाले, विद्यार्थ्यांच्या या यशाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. नियमित सराव आणि शिस्तीमुळेच हे यश शक्य झाले.
संघाचे प्रशिक्षक म्हणून परिमल पेडगावकर संदीप सानप यांनी काम पाहिले
पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघाची निवड झाली असून, त्यांच्याकडून आणखी उज्ज्वल कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.