पथारी विक्रेत्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देणे, संघाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविणे तसेच संघटनेचे कार्य जनमानसापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी भालेराव यांच्यावर सोपविण्यात आली आहे. राज्यातील पथारी विक्रेत्यांना संघटित करून त्यांच्या हक्कांसाठी काम करण्यासह संघाचा प्रचार व प्रसार करण्याच्या सूचनाही नियुक्तिपत्रात देण्यात आल्या आहेत.
आपल्या पदाच्या माध्यमातून पथारी विक्रेत्यांच्या न्याय्य मागण्या शासन व प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे भालेराव यांनी सांगितले. त्यांच्या नियुक्तीमुळे जालना जिल्ह्यातील पथारी विक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध सामाजिक संघटना, पदाधिकारी आणि पथारी विक्रेत्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.