📰 ताज्या बातम्या

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी गजानन महाराज संस्थानचा मदतीचा हात

च
श्याम सुंदर चित्तोडा
28 सप्टेंबर 2026•⏱️ १ मिनिटे वाचन
WhatsApp
शेगाव (प्रतिनिधी) : राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानने पुढाकार घेतला आहे. संस्थानच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीस तब्बल १ कोटी ११ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.

श्री गजानन महाराज संस्थानच्या प्रतिनिधींनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द केला. राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळावा, तसेच शासनाच्या मदतकार्याला हातभार लागावा, या उद्देशाने ही मदत देण्यात आली. 

यंदा अपुऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक भागांत गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

श्री गजानन महाराज संस्थान हे अध्यात्माबरोबरच सामाजिक कार्यातही कायम अग्रेसर राहिले आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात संस्थानने यापूर्वीही शासनाच्या मदतकार्याला आर्थिक सहकार्य केले आहे. या मदतीमुळे संस्थानने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले असून सर्व स्तरांतून या निर्णयाचे कौतुक करण्यात येत आहे.
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰
📡आपण ऑफलाइन आहात